Home रत्नागिरी अभिजात मराठी, अभिमान मराठी

अभिजात मराठी, अभिमान मराठी

0
अभिजात मराठी, अभिमान मराठी

महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच, जपान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अभिजात मराठी, अभिमान मराठी” सन्मान सोहळा महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत टोकियो जपान येथे संपन्न झाला.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर जपानमध्ये आयोजित हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सोहळा असल्यामुळे हा ऐतिहासिक क्षण ठरला.

या कार्यक्रमात मराठी भाषेचा अभिमान, अभिजातपणा आणि तिच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव करण्यात आला. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी जगभरात ७५ मराठी मंडळे स्थापन करण्याचा संकल्प मांडण्यात आला असून, मराठी भाषा जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प ना. डॉ उदय सामंत ह्यांनी या व्यासपीठावर दृढ केला.
जपान मधील मराठी समुदायासाठी हा सोहळा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here