रत्नागिरीकरबुडेतील वादळग्रस्त भागाची ना. उदय सामंतांकडून पाहणी

करबुडेतील वादळग्रस्त भागाची ना. उदय सामंतांकडून पाहणी

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी सकाळी 7 वाजताच रत्नागिरी दौऱ्या दरम्यान करबुडे गावातील वादळग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. वादळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत, त्यांच्याकरिता आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असं वक्तव्य मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केलं.

या पाहणीवेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, गावकर तांबे, प्रविण पांचाळ, सरपंच संस्कृती पाचकुडे, शंकर सोनवडकर, मंगेश सोनवडकर, वैभव कळंबटे, मिलिंद खानविलकर, सचिन पाचकुडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

रत्नागिरीत जागतिक महिला दिनानिमित्त “श्री अन्न महोत्सव” प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय...

स्त्री शक्तीचा जागर: पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा.

येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ७ मार्च रोजी...