एकीकडे शिवसेने तर्फे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकी साठी इच्छुकांची जोरदार बैठक पार पडली असतानाच हम भी कुछ कम नहीं च्या धर्तीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी तर्फे ही रत्नागिरी नगर पालीकेच्या ३२ जागांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असुन नगराध्यक्ष पदासाठी वहीदा बशीर मुर्तुझा आणि हिमानी मिलिंद कीर ही दोन नावे समोर आली आहेत—
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरी यांची कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक उमेदवार अशी एकत्रित बैठक विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली . रत्नागिरी नगर परिषदेच्या एकूण ३२ जागांसाठी आतापर्यंत ४० इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शहराध्यक्ष यांच्याकडे दिले आहेत.तर महिला नगराध्यक्ष पदासाठी हिमानी मिलिंद किर,व वाहिदा बशीर मूर्तुझा यांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे…
स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायची असली तरी वेळ पडल्यास वेगळे लढायची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी असे मत व्यक्त करण्यात आले. या बैठकीला प्रदेश सचिव बशीर मूर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलिंद किर,शहराध्यक्ष निलेश भोसले,युवक अध्यक्ष नौशीन काझी,विध्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम.आदिनी मार्गदर्शन केले.प्रसंगी माजी नगरसेवक सईद पावसकर ,माजी नगरसेवक बबन आंबेकर , जिल्हा सरचिटणीस रणजीत शिर्के ,कल्पना भिसे ,फर्जना मस्तान ,नजीर वाडकर ,सनीफ गव्हाणकर,पंकज पुसाळकर, रवी घोसाळकर सुरज् शेटे, मतीन बावनी, फुकरान मस्तान ,संदीप नार्वेकर ,मनोहर सुलताना फरहान मुल्ला ,शमीम नाईक, जयप्रकाश भालेकर ,प्रल्हाद शिंदे,मनोहर गुरव, निजाम पठाण,विश्वम्भर भाटकर,दादा वाडकर, आलिया मजगावकार,दूरधांना प्रभुळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
