रत्नागिरीबशीर मुर्तुझा यांनी निवडणुकीच्या काळा मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व...

बशीर मुर्तुझा यांनी निवडणुकीच्या काळा मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची घेतली भेट.

रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून वहीदा बशीर मुर्तुझा यांना मिळाला ग्रिन सिग्नयावेळी जिल्ह्याचे युवक अध्यक्ष नौसीन काझी हे ही उपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
येणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडी होणार कि नाही यावर चर्चा सुरू असतानाच बशीर मुर्तुझा यांनी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याने आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षतर्फे नगरपालिका निवडणुकी साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये शहरातील 32 वार्डसाठी 40 इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले व त्यामध्ये रत्नागिरी नगराध्यक्ष महिला सर्वसाधारण उमेदवारीसाठी 2 दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले . या घडामोडी होत असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा यांनी भेट घेतली तसेच वाय बी चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली . या भेटीदरम्यान जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकी च्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. मुख्य म्हणजे महिला नगराध्यक्ष साठी ज्या दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले त्यामध्ये बशीर मूर्तुझा यांच्या पत्नी सौ.वहिदा बशीर मुर्तुझा यांनीही अर्ज भरलेला आहे. त्यामुळे या भेटींची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार होत आहे. बशीर मूर्तुझा हे शरद पवार यांचे एकनिष्ठ असे अत्यंत जवळचे निकटवर्तीय आहेत त्यांचा रत्नागिरी शहरांमध्ये मोठा जनमत आहे हे नजरअंदाज करून चालणार नाही हेही तेवढेच खरं आहे . या भेटी दरम्यान राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष नौसीन काझी हे ही उपस्थित होते. त्यांनीही प्रभाग क्र. चार 4 कोकण नगर , कीर्ती नगर , क्रांतीनगर , स्टेट बँक कॉलनी , चर्मले या प्रभाग 4 मधून इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे अर्जाद्वारे मागणी केलेली आहे असे निदर्शनात येते त्यांची या वार्डामध्येही त्यांच्या संपर्क कार्यालयामार्फत कामाची जोरदार चर्चा आहे. कारण होऊन गेलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांना या प्रभागातून भक्कम लीड मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. असे झाल्यास माझी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्याबरोबर त्यांचा हाय व्होल्टेज सामना पहावयास मिळेल.
यावरून या सर्व घडामोडींचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हम भी किसीसे कम नही असा संदेश राजकीय वर्तुळात देताना यशस्वी होत असताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुका ह्या चुरशीच्याच होतील यामध्ये आता काही दुमत राहिलेलं नाही.

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...