दिनांक 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकी साठी एकुण सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.. दरम्यान सहा ही उमेदवार रिंगणात कायम राहणार की कोणी माघार घेणार याकडे समस्त रत्नागिरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे… आज तरी महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने.महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे आणि अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी च्या उमेदवार वहिदा मुर्तुझा यांच्यातच तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे… पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या साठी रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली असल्याने ते याकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे… उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व माजी आमदार बाळासाहेब माने यांनी ही परिवर्तन घडवून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे..
रत्नागिरी नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात– कोण मागे घेणार कि सहा ही उमेदवार रिंगणात कायम राहणार याकडे लागले सर्वांचेच लक्ष
