जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलीस भरती देवरुख येथे ए. एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानात दिनांक
30 नोव्हेंबर रविवार रोजी संपन्न झाली, या प्रसंगी देवरुख येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
श्री.उदय झावरे यांनी उद्घाटन केले.
महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेल्या 15,000 पेक्षा जास्त जागांच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर या डेमो भरतीचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील इच्छुक तरुणांना प्रत्यक्ष भरतीपूर्वी स्वतःचे मूल्यमापन करता यावे त्यानंतर त्यात सुधारणा करता याव्यात जेणेकरून या भरतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती पोलीस प्रशासनात रुजू होतील.
या उद्देशानेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.निलेश सांबरे साहेबांनी या डेमो भरतीचे आयोजन केले होते.या डेमो भरतीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून जवळपास 750 विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिजाऊ संस्थेचे मोफत चालवले जाणारे एक निवासी प्रशिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथे सुरू आहे.याच धर्तीवर रत्नागिरी शहरात 100 विद्यार्थ्यांचे दुसरे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा सांबरे साहेबांचा मानस आहे.
या डेमो पोलीस भरतीत पहिल्या 70 विद्यार्थ्यांना या निवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश दिले जाणार आहे.याशिवाय सध्या जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्ह्यात अनिवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी,लांजा, सापुचेतळे,देवरुख, गुहागर,जाकादेवी या ठिकाणी कार्यरत आहेत.या डेमो भरतीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वरील जिजाऊ संस्थेच्या केंद्रांमध्ये मोफत प्रशिक्षण घेता येईल.
या डेमो पोलीस भरतीच्या व्यवस्थापन व नियोजनात संस्थेचे सचिव श्री केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲड.महेंद्र मांडवकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिजाऊ संस्थेचे स्पर्धा परीक्षा प्रकल्प संचालक श्री संदीप पाटील,श्री वाल्मीक बिलसोरे,श्री.भूषण बोरसे,श्री.गौरव खर्चे, चि.हर्षल वानखेडे,
श्री.ओंकार तिवरेकर, श्री साहील गोरे दिशा भातळे,शीतल बोरसे, तन्वी कोलगे,अक्षरा लोखंडे यांनी परिश्रम घेतले.
डेमो पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणीसाठी सौरभ रावणांग, परेश रावणांग, सुहास आमटे,
सनी गुरव,राजेश गावडे,सौरभ कुळे यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
जिजाऊ संस्थेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री संदीप भदाने,श्री खेमचंद्र पाटील,श्री रितेश चव्हाण,श्री.शुभम निर्मल,श्री.ललित विसपुते,श्री.पंकज कांबळे यांचे लेखी परीक्षेसाठी विशेष सहकार्य लाभले.
मैदानी चाचणी दरम्यान जिजाऊ संस्थेची मेडिकल टीम मध्ये डॉ.गिरीश पिंगळे, डॉ.स्वप्नील तलाठी,श्री. मंडन गवंडे,स्नेहा जाधव, पल्लवी तावडे , संचिता सुर्वे, घनश्याम चव्हाण , अवधूत चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली.
जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिकेचे चालक श्री.मनोज पांचाळ श्री.विजय सुवरे
श्री.मुकेश होरंबे श्री सिद्धेश सावंत
श्री.कमलेश मांडवकर
श्री संदेश बडद यांचे सहकार्य लाभले.
डेमो पोलीस भरती दरम्यान जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी
श्री.योगेश पांचाळ
श्री.अनंत डिंगणकर,
श्री.स्वरूप सावंत
,श्री.राजेश धामणे,
श्री.मंदार नैकर,
श्री.दीपक सांबरे,
श्री.सचिन गोताड यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली.
लक्ष पोलिस वर्दी जिजाऊ संस्थेमार्फत, रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात,प्रथमच मोफत डेमो पोलीस भरती उत्साहात संपन्न!
