महाराष्ट्र35 वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वॉडो स्पर्धत गणराज क्लबची...

35 वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वॉडो स्पर्धत गणराज क्लबची कु.त्रिशा साक्षी सचिन मयेकर हीला रौप्य पदक🥈

35 वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वॉडो स्पर्धचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांनी जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड, लातूर दि 05 ते 07 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धत संपूर्ण राज्यातून सुमारे 300 खेळाडूनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकरीता गणराज क्लबची कु.त्रिशा साक्षी सचिन मयेकर ही इयत्ता 12 वी मध्ये लोकनेते शामरावजी पेजे आर्ट कॉमर्स व सायन्स ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकत आहे. त्रिशा हीची ही 17 वी राज्य स्पर्धा होती व वरिष्ठा गटाची पहिली स्पर्धा होती. त्रिशाला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतर राष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच , महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.त्रिशाच्या आई व बाबा यांच्या मोलाचा वाटा आहे. त्रिशाला सगळ्या ठिकाणी शुभेच्छा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदें यांनी त्रिशाला शुभेच्छा दिल्या, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर ,जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तसेच गणराज क्लब चे पदाधिकारी अध्यक्ष सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर,
सचिव रंजना मोडूंळा, सौ. स्नेहा मोरे, श्री परेश मोंडूला, शलाका जावकर, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?Churchill-systemet i Balloon ser robust...