रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21 पैकी 21 जागा जिंकून ऐतिहासिक...

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21 पैकी 21 जागा जिंकून ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आज शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांची भेट घेवून त्यांच्यासोबत विजयोत्सव साजरा केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21 पैकी 21 जागा जिंकून ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आज शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांची भेट घेवून त्यांच्यासोबत विजयोत्सव साजरा केला. एस.टी.स्टॅण्डजवळील महायुती निवडणुक प्रचार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सव सोहळ्यामध्ये मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन व सन्मान करुन, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला रोहयो मंत्री ना.भरतशेठ गोगावले, माजी आमदार श्री.संजय कदम, जिल्हाप्रमुख श्री.शशिकांत चव्हाण, माजी सभापती श्री.अण्णा कदम, नवनियुक्त नगराध्यक्षा सौ.माधवी राजेश बुटाला, नगरसेवक श्रीमती वर्षा सापटे, श्री.निकेतन पाटणे, श्रीमती दिप्ती शिगवण, श्रीमती नीता आमरे, श्री.सुनिल दरेकर, श्रीमती अंजून कुर्णे, श्री.तौसिफ खोत, श्री.यश खेडेकर, श्रीमती आरती पवार, श्री.सतीश चिकणे, श्री.स्वप्निल सैतवडेकर, श्रीमती स्वप्नाली चव्हाण, श्री. प्रेमळ चिखले, श्रीमती संजना कुडाळकर, श्रीमती रसिका खेडेकर, श्री.भूषण चिखले, श्रीमती रेश्मा खतीब, श्री.आरिफ मुल्ला, श्री.रहिम साहिबोले, श्रीमती वैभवी खेडेकर आदी उपस्थित होते.

Breaking News