काल मुंबईकडे रवाना होत असताना म्हसळा येथील मदरसा हेलिपॅडवर मद्रसा मध्ये शिकणारे काही विद्यार्थी अगदी प्रेमाने आणि आपुलकीने भेटले. त्यांच्या सोबत घालवलेले हे काही क्षण अत्यंत आनंददायी होते. भावी पिढीच्या स्वप्नांना बळ देणं आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहणं,हाच माझा सदैव संकल्प राहिला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. मद्रसा मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अचानक झालेली भेट कायम आठवणीत राहील असे मत ही खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीने मदरसा मधील विद्यार्थी भारावून गेले असल्याचे दिसून आले—
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
