रत्नागिरीप्रभाग क्रमांक १५ मधील राम आळी विकासकामांना मंजुरी — परशुराम ( दादा...

प्रभाग क्रमांक १५ मधील राम आळी विकासकामांना मंजुरी — परशुराम ( दादा ) ढेकणे यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील राम आळी विकासकामांना शासनाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही सर्व कामे परशुराम ( दादा ) ढेकणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे मंजूर झाली आहेत.

या विकासकामांसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

प्रभाग क्रमांक १५ मधील रस्ते डांबरीकरण, गटार व्यवस्था, स्ट्रीट लाईट बसवणे तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित कामांना या मंजुरीत समावेश आहे.

त्यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
या संदर्भात बोलताना परशुराम ( दादा ) ढेकणे यांनी सांगितले की, प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केला.

वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे ही कामे मंजूर झाली. येणाऱ्या काळातही विकासकामांसाठी आम्ही कटिबद्ध राहू.

या मंजुरीमुळे प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...