रत्नागिरीगुंबद-सैतवडे येथे ईद-उल-फितर उत्साहात साजरी

गुंबद-सैतवडे येथे ईद-उल-फितर उत्साहात साजरी

रत्नागिरी : जमीर खलफे
गुंबद-सैतवडे येथे ईद-उल-फितर उत्साहात साजरी–
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील गुंबद मोहल्ल्यात ईद-उल-फितर (रमजान ईद) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. गुंबद मोहल्ल्यातील गुंबद मस्जिदमध्ये आज सकाळी आठ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली.
नमाजानंतर रमजान महिन्यात पूर्ण महिना रोजे ठेवणाऱ्या, विशेषतः पहिल्यांदाच रोजा ठेवणाऱ्या लहान मुलांकडून सर्वांना नियाज वाटण्यात आली. त्यानंतर मोहल्ल्यातील नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण रमजान महिन्यात पाच वेळा नमाज तसेच तरावीह नमाजमध्ये इमामत करणारे इमाम साहेब, हाफिज साहेब आणि बांगी साहेब यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला आणि त्यांना सर्वांनी मनःपूर्वक मुबारकबाद दिली.
ईद नमाजासाठी मोहल्ल्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या संपूर्ण आयोजनासाठी गुंबद मोहल्ला जमात सदस्यांनी महिनाभर परिश्रम घेतले.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...