रत्नागिरीदिनांक २३/०३/२०२६ रोजी मिळालेल्या अवैध शिकारी बाबत गुप्त माहितीनुसार मौजे गिमवी ता.गुहागर...

दिनांक २३/०३/२०२६ रोजी मिळालेल्या अवैध शिकारी बाबत गुप्त माहितीनुसार मौजे गिमवी ता.गुहागर येथे रात्री 10.30 वा.फिरती करत असताना वेळी गिमवी गाव हद्दीत एक संशयित ४०७ टेम्पो वीणा नंबर प्लेटची थांबून तपासले असता सदर वाहनाच्या हवाद्या मध्ये एक मोठे रानडुक्कराची  शिकार करून ठार मारून ठेवलेले, तसेच त्या वाहना मध्ये एक डबल बार 12 बोर बंदूक आढळून आली

दिनांक २३/०३/२०२६ रोजी मिळालेल्या अवैध शिकारी बाबत गुप्त माहितीनुसार मौजे गिमवी ता.गुहागर येथे रात्री 10.30 वा.फिरती करत असताना वेळी गिमवी गाव हद्दीत एक संशयित ४०७ टेम्पो वीणा नंबर प्लेटची थांबून तपासले असता सदर वाहनाच्या हवाद्या मध्ये एक मोठे रानडुक्कराची  शिकार करून ठार मारून ठेवलेले, तसेच त्या वाहना मध्ये एक डबल बार 12 बोर बंदूक आढळून आली, सदरची शिकार ही प्रसाद सुभाष सोम,रोशन रमेश मोरे, संदीप वसंत गावडे सर्वजण रा.गिमवी ता. गुहागर असे आरोपींचा सहभाग आहे.सदरचे वन्य प्राणी मृत रानडुक्कर ,४०७ टेम्पो , 3 आरोपींसह ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण)अधिनियम ,१९७२ अन्वे कारवाई करण्यात आली आहे.पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई सौ.गिरीजा देसाई पाटील,.विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती.प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सरवर खान,वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण,श्री. अमित निमकर, वनपाल गुहागर,श्री. एस एस सावंत, वनपाल चिपळूण,श्री. सिद्धेश्वर गायकवाड,वनरक्षक रानवी,श्री.अरविंद मांडवकर,वनरक्षक अडूर, श्री.कुमार पवार,वनरक्षक आबलोली, श्री.राहुल गुंठे,वनरक्षक रामपूर,श्री.कृष्णा इरमले यांनी कारवाई केली.

Breaking News