रत्नागिरीपुणे येथे आयोजित वैकुंठ क्रिकेट क्लब प्रीमियर लीग – पर्व ४ या...

पुणे येथे आयोजित वैकुंठ क्रिकेट क्लब प्रीमियर लीग – पर्व ४ या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर ना. उदय सामंत ह्यांनी भेट दिली

पुणे येथे आयोजित वैकुंठ क्रिकेट क्लब प्रीमियर लीग – पर्व ४ या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर ना. उदय सामंत ह्यांनी भेट दिली–.

धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा, तसेच पत्रकारांनी एकत्र येत मैत्री, संघभावना आणि सकारात्मकता जपावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. पुणे जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहात सहभागी होतात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे म्हणत ना. उदय सामंत ह्यांनी या प्रसंगी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत पत्रकारांशी संवाद साधला.
“राजकारणात नसतो तर, भारतीय क्रिकेट टीममध्ये असतो,” असे यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

खेळ हा केवळ जिंकण्या-हरण्यापुरता मर्यादित नसून, तो एकोपा, विश्वास आणि संघटित शक्ती निर्माण करणारा माध्यम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पुढील वर्षी राजकीय नेते विरुद्ध पत्रकार असा सामना रंगला, तर तो देखील मैत्री, स्नेह आणि खेळभावनेचा उत्सव ठरेल, याची खात्री असल्याचे ना. उदय सामंत म्हणाले.

याप्रसंगी सागर आव्हाड, सज्जाद सय्यद, सचिन हंचाटे, सुमित भोसले, तुषार नन्नवरे आणि आदित्य भवर तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधी उपस्थित होते.

Breaking News