रत्नागिरीफूनगुसचा सुपुत्र सौदी अरेबियात चमकला;अर्श मुजावर चे घवघवीत यश

फूनगुसचा सुपुत्र सौदी अरेबियात चमकला;अर्श मुजावर चे घवघवीत यश

फूनगुसचा सुपुत्र सौदी अरेबियात चमकला;अर्श मुजावर चे घवघवीत यश,
फूनगुस—संगमेश्वर तालुक्यातील फूनगुस येथील स्व.नासिरभाई मुजावर यांचा नातू अर्श बासीत मुजावर याने सौदी अरेबिया येथील रधवा इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवत सौदी अरेबिया बोर्डात प्रथमश्रेणी पटकावली आहे.त्याच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
फूनगुस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पिर दर्गेचे व्यवस्थापक स्व.नासिरभाई मुजावर यांचा मोठा पुत्र बासित हा सुरुवाती पासूनच नोकरी निमित्त परदेशात राहिला आहे.परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर त्याने आपले कुटुंब देखील त्याठिकाणी स्थायिक केले.त्यांचा मोठा मुलगा अर्श हा बालपणापासूनच प्रचंड हुशार आणि चतुर कुशाग्रबुद्धीचा होता.मुळात अर्श चा जन्म फूनगुस गावाचा असून काही काळ त्याने चिपळूणमध्ये देखील शिक्षण घेतले होते.त्यानंतर सौदी अरेबिया येथील रधवा इंटरनॅशनल स्कुलमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि परदेशात एका वेगळ्या वातावरणात शिक्षणाला सुरुवात केली होती.
सौदी अरेबियाच्या वातावरणाशी जुळवून घेत “अर्श”ने शिक्षणाकडे पुर्णतः लक्ष दिले,मुळातच हुशार तसेच नेहमीच वेगळे काहीतरी करण्याची ऊर्जा असणाऱ्या अर्श ने प्रत्येक इयत्तेमध्ये प्रथमश्रेणीत येण्याचा मान मिळवला होता.इयत्ता १० मध्ये तर सुरुवाती पासूनच त्याने अभ्यासाकडे जातिनिशी लक्ष दिले.आई वडिल तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १० वी च्या प्रत्येक परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.सातत्यपूर्ण अभ्यास तसेच शिस्तप्रिय अर्श बोर्डात चमकणार अशी खात्री शिक्षक व आईवडिलांना होतीच,नुकतेच इयत्ता १० वी चे निकाल हाती आले,त्यामध्ये सौदी अरेबिया येथील रधवा इंटरनॅशनल स्कुल मधील अर्श बासित मुजावर याने तब्बल ९३ टक्के गुण प्राप्त करत प्रथमश्रेणी पटकावली आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...