रत्नागिरीराज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार ; शहर गॅस वितरकाकडे अर्ज करावा

राज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार ; शहर गॅस वितरकाकडे अर्ज करावा

राज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार ; शहर गॅस वितरकाकडे अर्ज करावा
जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांचे आवाहन
रत्नागिरी, (जिमाका) : राज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार करण्यासाठी जेथे पीएनजी पाईपलाईन पोहचलेली आहे, तेथील ग्राहकांनी नवीन पीएनजी जोडणीसाठी शहर गॅस वितरकाकडे अर्ज करावा, असे आवाहन प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद व वेगवान विस्ताराकरिता सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुसरुन नगरविकास विभागाने 27 मार्च 2026 रोजी शासन आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आदेश दिले आहेत. जिल्हा करिता नियुक्त केलेल्या सीजीडी संस्थेकडे तेथील नागरिकांनी/संस्थांनी घरगुती/व्यवसायिक वापराकरिता नवीन पीएनजी जोडणीकरिता अर्ज करावयाचा आहे. काही कारणास्तव सीजीडी संस्थेकडे अर्ज करणे शक्य न झाल्यास ग्राहकांनी पीएनजी जोडणीकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण व रत्नागिरी शहरात पीएनजी पोहचलेली असल्याने तेथील नागरिकांनी संस्थांनी व व्यवसायिकांनी घरगुती तसेच व्यवसायिक वापराकरिता नवीन पीएनजी जोडणीकरिता जिल्हा पुरवठा शाखा, पुरवठा निरीक्षक ऋशिकेष जाधव 9796844320, पुरवठा निरीक्षक अधिकारी, अभिजीत महाडिक, चिपळूण तहसिल कार्यालय 9167359496, रत्नागिरी सीएनजी स्टेशन मुख्य व्यवस्थापक महानगर गॅस अशिष प्रसाद 8308833331, चिपळूण सीएनजी स्टेशन मार्केटींग ऑफीसर संतोष गोरके 8805116771 यांच्याकडे अर्ज करावेत.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...