रत्नागिरीडॉक्टरांचे समर्पण आणि रुग्णांना उत्कृष्ट उपचार देण्याचे ध्येय शासकीय वैद्यकीय रुग्णालय रत्नागिरीने...

डॉक्टरांचे समर्पण आणि रुग्णांना उत्कृष्ट उपचार देण्याचे ध्येय शासकीय वैद्यकीय रुग्णालय रत्नागिरीने मध्ये चार महिलांची निःशुल्क क्लिष्ट थायरॉईड शस्त्रक्रिया (Thyroid Surgery) यशस्वीरित्या पार पडली आहे

डॉक्टरांचे समर्पण आणि रुग्णांना उत्कृष्ट उपचार देण्याचे ध्येय शासकीय वैद्यकीय रुग्णालय रत्नागिरीने मध्ये चार महिलांची निःशुल्क क्लिष्ट थायरॉईड शस्त्रक्रिया (Thyroid Surgery) यशस्वीरित्या पार पडली आहे

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयातील कान-नाक-घसा (ENT) विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक कामगिरी पार पडली आहे. कान-नाक-घसा विभाग, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात, रत्नागिरी येथे थायरॉईड शस्त्रक्रिया (Thyroid Surgery) ही अत्यंत जटिल आणि क्लिष्ट प्रक्रिया पूर्वी जास्त उपलब्ध नव्हती, परंतु आता कान-नाक-घसा विभाग प्रमुख तज्ज्ञ डॉ. सुनिता बागे डॉक्टरांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि प्रयत्नांमुळे अनेक रुग्ण या सुविधेचा लाभ घेत आहेत.
डॉ. सुनिता बागे यांनी आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे कठीण असलेल्या चार गरजू गरीब महिला श्रीम. प्राची गुरव वय 42, राहणार गणेशगुळे, ता.जि. रत्नागिरी, श्रीम. जानकी गुप्ता वय 59, राहणार MIDC, ता. जि. रत्नागिरी, श्रीम. चंदादेवी शहा वय 42, राहणार कारवांची वाडी, ता. जि. रत्नागिरी आणि श्रीम. दिपश्री गोताड वय 43 राहणार जाकादेवी, ता.जि. रत्नागिरी यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, हिच शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात केल्यास लाखो रुपयांचा खर्च आला असता, परंतु येथे रुग्णांकडून एकही रुपया घेतला गेला नाही. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉ. सुनिता बागे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात कान, नाक व घसाशास्त्र विभागाच्या डॉ. सुनिता बागे यांनी केलेली थायरॉईड शस्त्रक्रिया ही केवळ वैद्यकीय यश नाही, तर समाजासाठी धीर देणारी बाब आहे. ग्रामीण व सामान्य रुग्णांना मोठ्या शहरात न जाता आपल्या जिल्ह्यातच दर्जेदार उपचार मिळणे हे खरोखरच अभिमानास्पद आहे. थायरॉईड हा आजार सध्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. हार्मोनल बदल, जीवनशैलीतील बदल आणि तणाव यामुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते, परंतु त्याचा खर्च सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असतो. या पार्श्वभूमीवर या चार महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्व रुग्णांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत होती. काही जणी गृहिणी, तर काही जणी अल्प उत्पन्नावर कुटुंब चालवणाऱ्या होत्या. अशा परिस्थितीत हा मोफत उपचार त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवणारा ठरला.

डॉ. सुनिता बागे यांनी आपल्या ज्ञान, धैर्य आणि सेवाभावाच्या जोरावर ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांच्या या कार्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे आणि शासकीय आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गेल्या काही महिन्यांपासून गळ्यातील सूज, श्वास घेण्यास त्रास, अन्न गिळताना अडचण आणि आवाज जाणे अशा समस्यांनी त्रस्त होत्या. तपासणीनंतर त्यांच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये मोठी गाठ असल्याचे स्पष्ट झाले. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि अनुभवी डॉ. सुनिता बागे यांच्या मेहनतीमुळे हि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही गंभीर गुंतागुंत उद्भवली नाही, ही विशेष बाब मानली जात आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. डॉ. बागे यांनी सांगितले की, “रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांनी पुढे सांगितले की, योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा आजारांवर मात करणे शक्य आहे. या प्रकरणात ओटीमधील भूलतज्ञ डॉ. जमशीर शेख आणि डॉ. प्रियांका साळुंखे, शस्त्रक्रिया विभाग प्रभारी परिसेविका श्रीम. सुमन कोलापते, परिचारीका श्रीम. भावना कुलकर्णी यांची देखील मुख्य भूमिका होती.

रुग्णांच्या कुटुंबियांनी डॉ. सुनिता बागे यांचे आभार मानले असून त्यांनी सांगितले की, “आम्ही खूप चिंतेत होतो, पण डॉक्टरांनी आम्हाला धीर दिला आणि योग्य उपचार केले. आता आमच्या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे, ही आमच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट आहे.” अशा यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करता येतात, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माननीय अधिष्ठता डॉ. जयप्रकाश रामानंद सर यांनी डॉ. बागे मॅडम यांचे विशेष कौतुक केले. “अशा कठीण परिस्थितीतही शांतपणे आणि कौशल्याने शस्त्रक्रिया पार पाडणे हे त्यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय क्षमतेचे द्योतक आहे,” असे अधिष्ठता सरांनी सांगितले. डॉ. सुनिता बागे यांची निर्णयक्षमता, शांतता तसेच त्यांनी मॅडम यांच्या समर्पणाचे आणि रुग्णसेवेतील जबाबदारीचे विशेष कौतुक केले. अधिष्ठता सरांनी पुढे असेही नमूद केले की, “रुग्णालयासाठी डॉ. बागे मॅडम यांसारख्या डॉक्टरांची गरज होती. त्यांच्या कामामुळे इतर डॉक्टरांनाही प्रेरणा मिळते.” दरम्यान, डॉ. बागे मॅडम यांनीही माननीय अधिष्ठता सरांचे मार्गदर्शन आणि सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आभार मानले“. अधिष्ठता सरांचे प्रोत्साहन हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच डीन सरांचे नेहमी मिळणारे मार्गदर्शन, विश्वास व सतत मिळणारे प्रोत्साहन तसेच सर्व आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिले यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले“. अधिष्ठता सर नेहमीच आम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देतात आणि कठीण प्रसंगी आधार देतात,” असे त्या म्हणाल्या.

यासोबतच, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर सर यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. ते एक स्वत: अत्यंत निपुण आणि प्रगल्भ स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय ज्ञानामुळे आणि वेळेवर दिलेल्या सहकार्यामुळे उपचार प्रक्रिया अधिक सुलभ झाली. याबद्दल डॉ. बागे मॅडम यांनी डॉ. सांगवीकर सरांचे मनापासून आभार मानले. “डॉ. विनोद सांगवीकर सर हे अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टर असून त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे आहे,” असे त्यांनी सांगितले. या यशामुळे रुग्णालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...