रत्नागिरीबारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ ते १५ या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. राज्य मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी पुन:परीक्षा, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, जून-जुलैमध्ये नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून सादर (सबमिट) केल्यानंतर अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रीलिस्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची मुद्रित प्रत घेऊन अर्जात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. पडताळणी केल्याबाबत शाळाप्रमुख, प्राचार्य यांनी प्रीलिस्टच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहणार आहेत. नियमित आणि विलंब शुल्काने अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखा लवकरच कळवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा

नियमित शुल्कासह ५ ते १५ मे या कालावधीत, विलंब शुल्कासह १६ मे ते २१ मे या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना २१ मेपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे. तर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी २५ मेपर्यंत शुल्क भरल्याच्या पावत्या, विद्यार्थ्यांची यादी आणि प्रीलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...