रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच ३६९ वी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संगमेश्वर कसबा येथील स्मारकास रत्नागिरी पोलीस दलातर्फे पोलीस बँड पथकासह देण्यात आली मानवंदना—
👉दि. 14/05/2026 रोजी ३६९ वी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेसह औपचारिक अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना सादर करत संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्याच्या विचारांना आदरांजली वाहिली.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पोलीस बँड पथकासह संभाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना देण्याची ही ऐतिहासिक व अभिमानास्पद घटना असून, यामुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस बँड पथक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
