शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, मुरारीबाग येथील ‘सेना भवन’ येथे वैजापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमवेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे, शासकीय योजनांची गती आणि आगामी वाटचालीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सर्व आघाड्यांनी परस्परांमध्ये भक्कम समन्वय ठेवून पक्षाची ताकत वाढवून तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केले तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या अडीअडचणी व समस्या समजून घेऊन त्या पालकमंत्री श्री.संजयजी शिरसाट यांच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर तातडीने मार्गी लावाव्यात, याबाबत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.
या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री. संजयजी शिरसाट, खासदार श्री. संदिपान भुमरे, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार श्री. रमेश बोरणारे, संपर्कप्रमुख श्री. विलास पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. आबासाहेब गायकवाड, उपमहापौर श्री.राजेंद्र जंजाळ यांच्यासह सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
