रत्नागिरीक्षेत्रीय डाक पेन्शन अदालत २० जुलै रोजी पणजीत

क्षेत्रीय डाक पेन्शन अदालत २० जुलै रोजी पणजीत

क्षेत्रीय डाक पेन्शन अदालत २० जुलै रोजी पणजीत
रत्नागिरी, दि. १७ (जिमाका):- टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्याद्वारे गोवा पोस्टल क्षेत्र (ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे समाविष्ट आहेत ) यांची पोस्टल पेन्शन अदालत २० जुलै २०२६ (सोमवार) रोजी १५ वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणिसिंधुदुर्ग जिल्हे आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकरणे (कॅट / कोर्ट केसेस ), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इत्यादी आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांचे कार्यालय, पणजी यांचे नावे ६ जुलै २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. ई मेल आयडी accts.goa@indiapost.gov.in. ६ जुलै २०२६ च्या नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
०००

Breaking News