बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेत
पुण्याचे निधी, सार्थक यांची बाजी
मुंबई, दिनांक: स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या “बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेत” पुणे येथील निधी घारे हिने प्रथम, तर सार्थक बावीकर याने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. बदलापूर येथील सोजी मॅथ्यू हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
बालगंधर्व यांच्या १३८ व्या जयंती निमित्त स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही देशपातळीवरील स्पर्धा आयोजित केली होती. देशाच्या विविध शहरातील तब्बल ९७ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. त्यातील २७ जणांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली.
पु ल देशपांडे कला अकादमी येथे २६ जून रोजी या स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी संपन्न झाली. अंतिम फेरीसाठी नऊ स्पर्धकांची निवड झाली.
अंतिम फेरीचे परीक्षण संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ गायक अभिनेता मुकुंद मराठे, ज्येष्ठ गायिका अभिनेत्री बकुळ पंडित आणि ज्येष्ठ गायक अभिनेता ज्ञानेश पेंढारकर यांनी केले.
पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संयोजक तपस्या नेवे, अमेय रानडे, आयोजक रजनीश राणे, भाऊ कोरगावकर, शलाका कोरगावकर, विवेक माणगावकर, दिनेश पिळगावकर, प्रदीप चित्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे…
अरविंद पिळगावकर स्मृती प्रथम पुरस्कार २५००० रुपये आणि सन्मानचिन्ह
निधी घारे (पुणे)
सीताराम गणपती मणेरकर स्मृती द्वितीय पुरस्कार १५००० रुपये आणि सन्मानचिन्ह
सार्थक बावीकर (पुणे)
सुनीता प्रदीप चित्रे स्मृती तृतीय पारितोषिक १०००० रुपये आणि सन्मानचिन्ह
सोजी मॅथ्यू (बदलापूर)
शरद आचार्य स्मृती उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ३००० रुपये आणि सन्मानचिन्ह
चैतन्य फाटक (डोंबिवली)
तन्वी गोरे (डोंबिवली)
शिवम रायकर (फोंडा/गोवा)
सार्था गवाणकर (रत्नागिरी)
