रत्नागिरीनाचणे येथील स्मशानभूमीच्या पत्राशेड प्रेत ठेवण्याच्या जागेच्या दुरुस्तीचे भूमिपूजन ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

नाचणे येथील स्मशानभूमीच्या पत्राशेड प्रेत ठेवण्याच्या जागेच्या दुरुस्तीचे भूमिपूजन ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

नाचणे येथील स्मशानभूमीच्या पत्राशेड प्रेत ठेवण्याच्या जागेच्या दुरुस्तीचे भूमिपूजन ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

नाचणे येथील वाडेकरवाडी परिसरातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते पावसाळ्यात पावसापासून तसेच उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे अंत्यसंस्कार करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

स्मशानभूमीवरील पत्र्यांचे शेड पूर्णपणे तुटलेले व उडाले होते. तसेच प्रेत ठेवण्याच्या जागेचे बीमही पूर्णपणे खराब व धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांना प्रश्न निर्माण झाला होता.

स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई ढेकणे आणि भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या स्वनिधीतून नाचणे गावातील सुपलवाडी, बाणेवाडी व वाडेकरवाडी येथील ग्रामस्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्मशानभूमीमध्ये नवीन पत्राशेड प्रेत ठेवण्याच्या जागेची बीमसह आवश्यक दुरुस्ती निधी उपलब्ध करून दिला या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले

यावेळी जागेचे मालक लंबोदर करमरकर तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे नाचणे ग्रामपंचायत सदस्या शिवानी रेमुळकर, भाजपा पदाधिकारी सुनील नाचणकर, समीर सावंत, राकेश कदम, दीपक सुपल, दत्ता घडशी, नानू वाडेकर, भाऊ वाडेकर तसेच महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या सुमन घाणेकर, संध्या चवंडे, मंजिरी चव्हाण, वर्षा पाटकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या विकासकामामुळे वाडेकरवाडी,बाणेवाडी आणि सुपलवाडी परिसरातील नागरिकांना आवश्यक सुविधा असलेली स्मशानभूमी होणार आहे. विशेषतः पावसाळा व उन्हाळ्यात अंत्यसंस्कारावेळी होणारा त्रास कमी होणार असून धोकादायक अवस्थेतील बीम बदलल्याने सरनेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी भाजपा प्रदेशअध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाणसाहेब सौ. वर्षाताई ढेकणे दादा ढेकणे यांचे मनःपूर्वक आभार मानत समाधान व्यक्त केले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...