रत्नागिरीसीमेवरील शूरवीर बांधवांसाठी रत्नागिरीतून प्रेमाचे धागे ; महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी...

सीमेवरील शूरवीर बांधवांसाठी रत्नागिरीतून प्रेमाचे धागे ; महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पाठवल्या राख्या

सीमेवरील शूरवीर बांधवांसाठी रत्नागिरीतून प्रेमाचे धागे ; महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पाठवल्या राख्या
रत्नागिरी, (जिमाका)- श्रावण महिना आला की वेध लागतात ते रक्षाबंधनाचे ! भावा-बहिणीच्या अतुट आणि निस्सीम प्रेमाचा हा सण ! पण, जेव्हा आपला लाडका भाऊ सीमेवर ऊन, वारा, बर्फ अन् पावसाची तमा न बाळगता मातृभूमीचे रक्षण करत असतो, तेव्हा सणाच्या दिवशी त्याच्या मनगटावर राखी बांधायला कोण जाणार? हीच हूरहूर ओळखून रत्नागिरीतील शिरगाव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या लेकींनी एक अतिशय हृदयस्पर्शी आणि भावनिक पाऊल उचलले. रेशमी धाग्यांतून गुंफले प्रेम आणि आशीर्वाद बी.सी.ए.च्या द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनींनी आपल्या कोमल हातांनी, सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या आपल्या ‘६/१ गोर्खा राईफल्स’च्या शूरवीर भावांसाठी राख्या गुंफल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या बर्फाळ, दुर्गम आणि धोकादायक सीमेवर जेव्हा या राख्या पोहोचतील, तेव्हा त्या केवळ सुताचे धागे नसतील; तर त्यासोबत असेल या बहिणींच्या काळजातून आलेला आशीर्वाद, त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेली प्रार्थना आणि उबदार प्रेम.
एका पवित्र भावनेने भरलेला हा उपक्रम नुकताच पार पडला. विद्यार्थिनींनी स्वहस्ते बनवलेल्या या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांच्याकडे अत्यंत अभिमानाने सुपूर्द केल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर आणि राष्ट्रीय सेवा समितीच्या प्रमुख श्रुती यादव यांच्या संवेदनशील मार्गदर्शनाखाली फुललेला हा उपक्रम म्हणजे निव्वळ एक औपचारिक कृती नसून, सीमेवरील जवानांप्रती असलेली कृतज्ञतेची एक निखळ पावती आहे.
बहिणीच्या मायेची ऊब आणि उंचावलेले मनोबल
सणाच्या दिवशी घराची आणि ताईची आठवण येऊन जेव्हा जवानांचे मन क्षणभर कासावीस होईल, तेव्हा हे रेशमी धागे त्यांना बहिणीच्या मायेची ऊब देतील. सुट्ट्या न मिळाल्यामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या त्या योद्ध्यांना बहिणीची उणीव भासू नये, हाच यामागचा उदात्त हेतू आहे. ‘आम्ही सुरक्षित आहोत कारण, तुम्ही सीमेवर आहात, आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत’, हा निःशब्द संदेश देणाऱ्या या राख्या सीमेवरील त्या पोलादी छातीच्या जवानांचे मनोबल निश्चितच द्विगुणित करतील.
सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री ताटे यांनी या लेकींच्या निखळ भावनेचे मनापासून कौतुक केले, तेव्हा उपस्थित कर्मचारी वर्गाच्या डोळ्यांतही कृतज्ञतेचे भाव तरळले होते. खऱ्या अर्थाने, हा रक्षाबंधनाचा सण सीमेपार जाऊन नात्यांची एक नवी आणि अभेद्य गुंफण करून गेला आहे.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...