नाटे गावात शिवसेनेचा मोठा राजकीय धमाका!
👉ग्रामपंचायत सदस्या सहित शेकडो ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश–
👉शिवसेना हा सामान्य जनतेचा पक्ष:- आमदार किरण सामंत
👉जनतेला हवे असलेले प्रकल्पच मतदार संघात येतील हा आमदार म्हणून नाटे वासियांना दिला शब्द-
👉राजापूर : लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील नाटे गावात शिवसेनेला मोठे राजकीय बळ मिळाले असून ग्रामपंचायत सदस्या सहित शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे नाटे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.*
या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे शिवसेने मध्ये स्वागत केले. पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार किरण सामंत यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “शिवसेना हा सामान्य जनतेचा पक्ष आहे. विकास, जनसेवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व संधी दिली जाईल. नाटे गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील.”
या कार्यक्रमात शिवसेना नेते रवींद्र नागरेकर, राजू कुरूप, तालुका प्रमुख दीपक नागले, सभापती नंदनी कदम, जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाले, पंचायत समिती सदस्या जानवी गावकर, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, मनोज अडविलकर, विनोद शेलार, रमेश लांजेकर, आदिल मस्कर, गिरीश कळगुंटकर, मुन्ना खामकर, प्रसाद गुरव, अजित बंडबे यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आमदार किरण सामंत यांचे स्वागत केले. पक्षप्रवेशासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता.
नाटे गावातील हा पक्षप्रवेश सोहळा आगामी काळातील राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात निश्चितच मोठी भर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्या सहित शेकडो ग्रामस्थांचा झालेला हा प्रवेश लांजा-राजापूर मतदारसंघातील शिवसेनेसाठी मोठे यश मानले जात आहे.
या वेळी ग्रामपंचायत सदस्या ज्योती पेडणेकर, दिपाली मयेकर, अक्षय मयेकर, हरिश्चंद्र मयेकर, शारदा मयेकर, स्वाती सासोंकर, प्रदीप मयेकर, प्रमिल मयेकर, मनिषा लाखन, शर्वरी लाड, यल्लू लाड, मंथन पाटील, दीक्षा वाघे, निशा पवार, पुष्पलता यशवंत आंबोळकर, प्रसाद मंगेश आरेकर, सानवी सुदेश मयेकर, सुदेश सुधीर मयेकर, सुनिता सुधिर मयेकर, मयुरेश नरेंद्र शिखडकर, जितेंद्र यशवंत शिखडकर, ज्योती निलेश शिखडकर, गणेश विलास पारकर, प्रभाकर यशवंत वाडेकर, सोनाक्षी संतोष वाडेकर, विशाखा वसंत वाडेकर, पार्वती वसंत वाडेकर, मनिष नंदकुमार मसुरकर, मोनेस मनिष मसुरकर, मीनाक्षी नंदकुमार मसुरकर, प्रविण रविलाल होलम, सम्राज्ञी प्रविष्ण होलम, साबिका प्रविण होलम, निधी प्रविण होलम, मनिषा बांधकर, शर्वरी सचिन लाड, सल्लू पर्शुराम पाटील, मंथन मनोहर परिक, विशाखा विश्वास सातुर्डेकर, दिस्ता विनायक वाधे, विराज विनायक वाघे, निशा रमेश पवार, सिमा संतोष पवार, दर्शना विश्वनाथ बांदकर, साधवी तुळशीदास लाड, अनंत भिकाजी बोदकर, प्राची प्रमोद कलव, तेजश्री श्रीकांत बांदकर, सानवी प्रमोद बांदकर, वैशाली विजय गडकर, हीराबाई भुजंग पवार, मनोहर गोविंद पाटीक, प्रथमेश विश्वनाथ बांदकर, नितेज आंबेळकर, यश आंबोळकर, सुगंध ठाकरे, माधुरी ठाकरे, विनोद नार्वेकर, विजय पारकर, वंदना पारकर, विशाखा पारकर, प्रमीला नार्वेकर, विशाल आबोळकर, सुगंधा आडोळकर, महेंद्र आंबोळकर, हेमंत आंबोळकर, जीताबाई मेलेकर, संतोष पांगले, गुलाब चौधरी, रुपाली मेळेकर, प्रणित आंबोळकर, संदेश आंबोळकर, महेश आंबोळकर, मयुरी आंबोळकर, नितिन भरत बाणे, अभिजित परेश मिराशी, तुवून साठवा, जितु बाणे, परेश लकूल, चंद्रकांत प्रांजल लकुल (ग्रामपंचायत सदस्य) मिराशी (उबाठा शाखाप्रमुख), सानिका कोठारकर, सानिमा भाबोळकर, रुपाली सागवेकर
यांनी पक्ष प्रवेश केला.
