रत्नागिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप रत्नागिरी शहर मंडळातर्फे रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप रत्नागिरी शहर मंडळातर्फे रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप रत्नागिरी शहर मंडळातर्फे रक्तदान शिबिर; ५६ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे व संयोजक अजिंक्य केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण केल्या.

या प्रसंगी भाजप शहर सरचिटणीस संदीप सुर्वे निलेश आखाडे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके उपाध्यक्ष राजू भाटलेकर उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर महिला मोर्चा रत्नागिरी द. जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे महिला मोर्चा शहराध्यक्षा भक्ती दळी नगरसेवक नितीन जाधव सुप्रिया रसाळ मानसी करमरकर राजू तोडणकर मंदार भोळे मंदार खंडकर डॉ. ऋषी केळकर मनोज पाटणकर सोनाली केसरकर संदीप रसाळ अशोक वाडेकर पुंडलिक पावसकर संकेत कदम शोनाली आंबेरकर प्रज्ञा टाकळे शैलेश बेर्डे मुक्ता बाष्टे प्रसाद बाष्टे नुपूरा मुळ्ये प्रशांत घाणेकर सायली बेर्डे विजया भाटकर अद्वैत कुळकर्णी पुंडलिक पावसकर मंदार खंडकर आणि भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी रक्तदात्यांचे आभार मानत, “रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून समाजहिताच्या अशा उपक्रमांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करणे हीच त्यांना खरी मानवंदना आहे,” असे सांगितले.

पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांच्या संयुक्त सहभागातून हे रक्तदान शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...