रत्नागिरीरंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न–
👉चिपळूण, निवळी तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या पुढाकाराने स्थानिक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळेत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता कलात्मकता आणि आत्मविश्वास वाढविणे तसेच शिक्षणासोबतच कला क्षेत्राची आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

स्पर्धेत शाळेतील विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक, रंगसंगती, कल्पकता आणि स्वच्छतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांचा आनंद, उत्साह आणि सृजनशीलता लक्षणीय पाहावयास मिळाली. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेचे नियोजन, सहभागाचे महत्त्व, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनबद्ध पद्धतीने संचालन केले.
स्पर्धेनंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभासाठी कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक रोशन मोहिरे व प्रशांत इंगवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रधान करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी अश्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते, असे सांगितले.
हा उपक्रम कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
संपूर्ण चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी आणि कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदूत कु. देवयानी गुरव, दीक्षा कांबळे, गौरी भंडगर, क्रांती देवकर, तेजल भिंगारदेवे , सुप्रिया धामणीकर, समीक्षा सोरदे, सुहानी घाडगे, नम्रता अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि हा उपक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.

Breaking News

‘बालजगत’मध्ये दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास

'बालजगत'मध्ये दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवासरत्नागिरी...

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘सनातन पंथ शास्त्र’ ग्रंथाचे लोकार्पण

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'सनातन पंथ शास्त्र' ग्रंथाचे...