रत्नागिरीश्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) शैक्षणिक संस्थेचा उद्घाटन सोहळा ४ ऑगस्ट...

श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) शैक्षणिक संस्थेचा उद्घाटन सोहळा ४ ऑगस्ट रोजी

श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) शैक्षणिक संस्थेचा उद्घाटन सोहळा ४ ऑगस्ट रोजी—
कोकणातील उच्च शिक्षणाला मिळणार नवी दिशा–
👉 कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ (विशिष्ठ श्रेणी अंतर्गत) या कोकणातील पहिल्या आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा मंगळवार, ता. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी. संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुरूप बहुविषयक, कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख शिक्षण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने हे विद्यापीठ कार्यरत राहणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबत भारतीय ज्ञानपरंपरा, संशोधन, नवोपक्रम आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर यांनी सांगितले. 

या विद्यापीठामध्ये कालानुरूप सतत गतिमान असणाऱ्या जगाशी विद्यार्थ्यांना स्पर्धा करता यावी याकरिता अवकाश शास्त्र, सेंद्रिय शेती उत्पादन, दर्शन शास्त्राच्या माध्यमातून वेदाध्ययन, क्रीडा ,बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन अशा नाविन्यपूर्ण विषयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता,मानसिक संतुलन, डेटा सायन्स, ड्रोन, च्या माध्यमातुन आत्मनिर्भयतेकडे वाटचाल कशी करावी याकरता सामान्य बी.एस्सी. विषय न निवडता -बी.एस्सी. स्पेस सायन्स, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, बी.एस्सी. नॅचरल फार्मिंग विथ ए.आय., बी.एस्सी. सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ, एम.एस्सी. क्लिनिकल अँड काउन्सेलिंग सायकॉलॉजी, बी.ए. व एम.ए. दर्शन शास्त्र (IKS आणि संस्कृत), बी.एस्सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन विथ ए.आय. तसेच एम.एस्सी. ॲडव्हान्स बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन यांसारखे अभिनव अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत. विद्यापीठाची शैक्षणिक रचना विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी आणि ऑनर्स/ संशोधन पदवी असे मल्टिपल एंट्री-एक्झिट पर्याय उपलब्ध करून देणारी असेल

उद्घाटन सोहळ्यात आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यापीठ गीताचे प्रकाशन तसेच शैक्षणिक वाटचाली विषयीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास पिंपरी येथील. डॉ डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र राज्य (NEP 2020) सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार तसेच मुंबईच्या टाटा मेमोरिअल सेंटरचे माजी शिक्षण संचालक डॉ. श्रीपाद बाणावली यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

कोकणातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे, संशोधन व कौशल्य विकासाला चालना देणे आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची नवी दिशा निर्माण करणे, या उद्दिष्टांप्रती हे विद्यापीठ कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यास शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...