रत्नागिरीराजापूरमध्ये मनसेला मोठे खिंडार

राजापूरमध्ये मनसेला मोठे खिंडार

💥राजापूरमध्ये मनसेला मोठे खिंडार

मनसेच्या शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश-

राजापूर मनसे तालुकाध्यक्ष उपतालुकाध्यक्ष यांच्यासहित शेकडो पदाधिकारी शिवसेनेत लाख

💥आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त; शिवसेनेची राजापूर तालुक्यातील ताकद आणखी वाढली
👉 राजापूर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून, मनसेचे शेकडो कार्यकर्ते आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाल्याची चर्चा सुरू आहे.*

आयोजित प्रवेश सोहळ्यात आमदार किरण सामंत यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेचा भगवा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राजापूर व लांजा मतदारसंघात आमदार किरण सामंत यांनी राबविलेली विकासकामे, सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संवाद, प्रत्येक गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची भूमिका आणि कार्यकर्त्यांना दिले जाणारे बळ यामुळे प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, “शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. विकास, जनसेवा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान ही आमची भूमिका आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल. राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू.”

त्यांनी पुढे सांगितले की, पक्षवाढीसोबतच जनतेच्या प्रश्नांचे निराकरण हेच आपले प्रमुख ध्येय असून, प्रत्येक गावात विकासाची गती अधिक वाढविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

या प्रवेश सोहळ्यामुळे राजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा तसेच शासनाच्या विकास योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध गावांतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये पंकज पंगेरकर तालुका अध्यक्ष, संजय जड्यार लालूका सचिव (ओणी ग्रामपंचायात ,जयेंद्र कोटारकर – उपतालुका अध्यक्ष.,गुरुप्रसाद गवाणकर – माडबन ग्रामपंचायत सदस्य,सादिक काझी विभाग सघरक (सागवे), सुरेंद्र मयेकर विभाग अध्यक्ष, उमेश ढाले उपविभाग अधारित, सूनिल आये – उपविभाग अध्यक्ष,शंकर लांबे शाळा अध्यात, राकेश कणेरी – उपशाच्या अर्थक, जयेश पडवळ – प्रसि प्रसिध्दी प्रमूख (मिडिया) व्राजापूर , नरेश आंबेकर – तुळसुदे अध्यक्ष – किक रमाई मंदिर,सुनिल नारेकर नाटेकर – खजिनदार -मनोज वाडकर शाब्या अध्य अध्यक्ष, सूज आडिवरेकर गर अध्यक्ष, हर्ष जयार गर अध्यक्ष
स्वानिक नध्यार – महाराष्ट्र सैनिक., संकेत बाडेकर माध्य विभाग,योगेश सुर्वे,प्रमोद आंबेरकर, मच्छिंद्र बेश्कर
प्रामनाथ अन् नाटेकर
संदीप नाटेकर,मनोज आंबेरकर,रामबंद शिरगांवकर.मिलिंद देवक,मिलिंद आडिवरेकर-
निनाद हरजकर हरजकर
जितेहा आहविडकर, गोविंद ओवेरकर: सुनिल आंबेरकर,दिवाकर सांबेरकर मुस्ताक हुने, जावेद मुजावर
संदेश बसनकरसईम बोदवडेकर आशिक मालीम आदींनी प्रवेश केला.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...