रत्नागिरीसह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात...

सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सोसायटीला ७४.६२ लाखांचा निव्वळ नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर
सावर्डे, प्रतिनिधी : सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विविध उपक्रम, गुणवंतांचा गौरव आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेत सोसायटीच्या वर्षभरातील आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम तसेच संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. अनुराधाताई निकम यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सोसायटीचे उपाध्यक्ष शैलेश सुर्वे यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष नामदेव गावडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सोसायटीला ७४ लाख ६२ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. याच कालावधीत ठेवींमध्ये १ कोटी रुपये, भागभांडवलात ३५ लाख रुपये आणि कर्जवाटपात १ कोटी रुपयांची वाढ झाली असून सभासदांच्या विश्वासामुळे सोसायटीची आर्थिक प्रगती अधिक भक्कम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेदरम्यान सह्याद्री शिक्षण संस्थेचा इतिहास, शैक्षणिक उपक्रम व विविध सुविधांची माहिती देणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्था माहिती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच लेखक राजेंद्रकुमार वारे लिखित ‘गोपनीय अहवाल लेखन’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत शिक्षक तसेच माध्यमिक परीक्षा आणि इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, सावर्डे विद्यालयाने ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात विभागात प्रथम क्रमांक मिळविला असून खेर्डी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षा आणि CET उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. Competitive Academy मध्ये १६ शाळा, ४० शिक्षक व सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी आहेत. सावर्डे, खेर्डी आणि इंग्लिश मीडियम शाळेत अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ महाविद्यालयाला NAAC ‘B’ ग्रेड, डिप्लोमा फार्मसीला NBA मानांकन, तर डिग्री फार्मसीने देशात ७३ वा क्रमांक मिळविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अ‍ॅग्रीकल्चर, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट आणि बी.एस्सी. आयटी महाविद्यालयांची NAAC प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय फार्मसी विभागातील पाच प्राध्यापकांच्या संशोधन पेटंट्सचे भारत सरकारकडून प्रकाशन झाले असून पॉलीटेक्निकच्या १०७ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळाले आहे. सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या १९ विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड होऊन त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इसहाक खतीब यांनी स्व. गोविंदरावजी निकम यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच आमदार शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आणि सोसायटीची प्रगती सातत्याने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सभेला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, उपाध्यक्षा युगंधराताई राजेशिर्के, उपाध्यक्ष डॉ. इसहाक खतीब, सचिव महेश महाडिक, संचालक चंद्रकांत सुर्वे, मारुतीराव घाग, गुलाबराव सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या पुजाताई निकम, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्या पूजा पाष्टे, सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय काटे तसेच संचालक, शिक्षक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पालकर आणि सचिन पोकळे यांनी केले, तर तुकाराम पाटील यांनी आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सभेमुळे सह्याद्री परिवारातील शिक्षक, कर्मचारी व सभासदांमध्ये एकोपा आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...