रत्नागिरीएक राखी सैनिकांसाठी उपक्रमातून सीमेवरील जवानांना प्रेमाची ओवाळणी - सती चिंचघरी प्राथमिक...

एक राखी सैनिकांसाठी उपक्रमातून सीमेवरील जवानांना प्रेमाची ओवाळणी – सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी भारतीय जवानांना पाठविल्या एक हजार राख्या व संदेशपत्रे

एक राखी सैनिकांसाठी उपक्रमातून सीमेवरील जवानांना प्रेमाची ओवाळणी – सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी भारतीय जवानांना पाठविल्या एक हजार राख्या व संदेशपत्रे

सहयाद्रि शिक्षण संस्थेची ISO 9001:2015 मानांकन प्राप्त सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) हे एक उपक्रमशील विद्यालय आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून गेले अनेक वर्षे विद्यार्थी एक राखी भारतीय जवानांना या उपक्रमाखाली राख्या पाठवतात. भारतीय जवान प्राण पणाला लावून देशाची सेवा करीत आहेत. सर्वच जवानांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची राखी बांधण्यासाठी येता येत नाही. देशसेवेविषयीची भावना वाढीस लागावी, या विचाराने विद्यालयाच्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थिनींना एकत्र करून १००० आकर्षक राख्या तयार केल्या व सोबत एक संदेश पत्र असे स्वतंत्र पाकिटात भरून भारतीय सीमेवरील जवानांना पाठविण्यासाठी माजी सैनिक सुभेदार श्री. प्रदिपराव चाळके साहेब, शिपाई श्री. दिपक राजवीर साहेब यांच्या शुभहस्ते भारतीय जवानांना राख्या पाठवण्यात आल्या. कार्यक्रमावेळी सदर माजी सैनिक वर्दीमध्ये आले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेविषयी अधिक प्रबळ इच्छा निर्माण झाली. प्रथम विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीत सादर केले . यावेळी भारत माता की जय… वंदे मातरम् अशा घोषणांनी सभागृह दणाणून निघाले. सीमेवरील जवानांची राखण तर राखीतून विद्यार्थ्यांचे प्रेम अशा भावनिक वातावरणात हा उपक्रम उत्साहात पार पडला .कार्यक्रमाचे आयोजन वर्षा सकपाळ मॅडम यांली तर सुत्रसंचलन विनया नटे यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात ,वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण शिक्षकेतर कर्मचारी विजया मौजे , विनोद उदेग, एकनाथ चाळके यांनी विशेष मेहनत घेतली.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...