रत्नागिरीसावर्डे विद्यालयात व्यसनमुक्तीचा संकल्प ,विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्त भारतासाठी शपथ

सावर्डे विद्यालयात व्यसनमुक्तीचा संकल्प ,विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्त भारतासाठी शपथ

सावर्डे विद्यालयात व्यसनमुक्तीचा संकल्प
विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्त भारतासाठी शपथ; जनजागृतीचा निर्धार
सावर्डे (प्रतिनिधी) : आधुनिक युगात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावेत, तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती व्हावी आणि समाज व्यसनमुक्त होऊन राष्ट्रकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमाला विद्यालयाचा खारीचा वाटा असावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांना व्यसनांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी “मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहीन,” असा दृढ संकल्प केला.
तसेच भारतातील प्रत्येक नागरिक निर्व्यसनी राहण्यासाठी प्रयत्न करणे, व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करणे, अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहणे आणि समाजात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व भारतीय राज्यघटनेचा आदर करण्याचाही संकल्प केला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या विचारांवर तसेच त्यांच्या माध्यमातून पालक व समाजावर दूरगामी सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी “जय व्यसनमुक्ती – जय महाराष्ट्र – जय भारत!” असा जयघोष करत व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार केला.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...