रत्नागिरीडॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त डी.जी.के. महाविद्यालयात विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,...

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त डी.जी.के. महाविद्यालयात विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन व लेख स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त डी.जी.के. महाविद्यालयात विविध उपक्रम
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन व लेख स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि मा. आम. स्व. सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, लेख स्पर्धा आणि बक्षीस वितरण अशा विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा कोषाधिकारी श्री. प्रविंद बिरादार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. एस. आर. रंगनाथन व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस प्राचार्या सौ. मधुरा पाटील आणि उपप्राचार्या सौ. जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात जिल्हा कोषाधिकारी श्री. प्रविंद बिरादार यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. दहा वर्षांच्या अध्यापन कार्यासह प्रदीर्घ प्रशासकीय सेवेचा अनुभव आणि आतापर्यंत घेतलेल्या सुमारे २०० व्याख्यानांच्या अनुभवातून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन आणि यशासाठी आवश्यक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाधारित मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याची नवी दिशा मिळाली.

रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह श्री. महेंद्र दळवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृती, ग्रंथालयाचा प्रभावी वापर आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये संदर्भग्रंथांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. मा. आम. स्व. सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. श्री. विश्वनाथ बापट यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी आयोजित लेख स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक कु.निलाक्षी पुरुषोत्तम राऊत. tyba, द्वितीय क्रमांक कु.गौरवी मंदार ओळकर. Tyb.com  आणि तृतीय क्रमांक कु.समृद्धी सुरज बोरकर. tybsc यांनी पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम, पुस्तके व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील पुस्तके, संदर्भग्रंथ आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस उपयुक्त साहित्य मांडण्यात आले होते. या उपक्रमाचा सुमारे १८० विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात वाचन, ग्रंथालयाचा वापर आणि ज्ञानार्जनाची सकारात्मक चळवळ निर्माण झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हळदणकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन ग्रंथपाल साईप्रसाद पवार आणि अंतरा रहाटे यांनी केले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, ग्रंथालयाविषयी आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आत्मविश्वास निर्माण करण्यास हातभार लागला.

Breaking News

फिनोलेक्स च्या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी केले कौतुक व मानले आभार

फिनोलेक्स च्या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी केले कौतुक व मानले...

दीप अमावस्येनिमित्त नाखरे कालकरकोंड शाळेत संस्कारांची ‘दीपज्योत’

दीप अमावस्येनिमित्त नाखरे कालकरकोंड शाळेत संस्कारांची 'दीपज्योत'रत्नागिरी : रत्नागिरी...