रत्नागिरीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा;

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते अंगदान – जीवन संजीवनी अभियान अंतर्गत वृक्षारोपण…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने साजरा करण्यात आला. या सुवर्णमयी क्षणाचे औचित्य साधून, राज्य शासनाच्या ‘अंगदान – जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्य यांचा मेळ घालणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. वसीम सय्यद, उप अधिष्ठाता डॉ. रामा भोसले, सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
‘वृक्षारोपण’ हे निसर्गाचे रक्षण करून नव्या सृष्टीला जन्म देते, तर ‘अंगदान’ हे मृत्यू पश्चात दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान देणारे पवित्र कार्य आहे, हा उदात्त विचार या संयुक्त मोहिमेद्वारे समाजासमोर ठेवण्यात आला.
या प्रसंगी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले, “स्वातंत्र्याचा हा ८० वा वर्धापनदिन आपण केवळ उत्सव म्हणून साजरा न करता, एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहत आहोत. झाडे लावणे आणि ती जगवणे जेवढे गरजेचे आहे, तितकीच आजच्या काळात अंगदानाबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. आज लावलेले प्रत्येक रोप जसे भविष्यात निसर्गाला संजीवनी देईल, तसेच समाजाने अंगदानाचे महत्त्व ओळखल्यास हजारो रुग्णांना नवीन आयुष्य मिळू शकेल.” या विशेष मोहिमे अंतर्गत आगामी काळात रत्नागिरी जिल्हा व परिसरात महाविद्यालय आणि रुग्णालयामार्फत विविध जनजागृतीपर व्याख्याने आणि माहिती शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याबाबत सांगण्यात आले.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...