रत्नागिरीखेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी दादांची परंपरा चालवणार

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी दादांची परंपरा चालवणार

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ; राज्य खो-खो संघटनेतर्फे जिल्हा संघटनांना लॅपटॉप

पुणे,  ऑगस्ट ः “खेळ आणि खेळाडूनची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य खो-खो संघटनेचे माजी अध्यक्ष अजितदादा यांची परंपरा पुढे कायम चालवणार आहे. आजच्या डिजीटल युगाचे महत्व ओळखून राज्य संघटनेने सर्व जिल्हा संघटनांना लॅपटॉप भेट दिले. हा उपक्रम निश्चितच सर्वांसाठी आदर्शवत आहे, ” असे प्रतिपादन राज्य संघटनेच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनतर्फे पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे आयोजित लॅपटॉप वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई यांच्या हस्ते राज्य संघटनेशी संलग्न सर्व जिल्हा संघटनांचे सचिव, तांत्रिक समिती व पंचमंडळ यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. डिजिटल युगात क्रीडा व संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि अद्ययावत व्हावे, या उद्देशाने राज्य संघटनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, “आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात क्रीडा क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज असो वा स्पर्धांचे नियोजन, ते डिजिटल होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा संघटनांचे सचिव, तांत्रिक समिती आणि पंच हे कोणत्याही संघटनेचा मुख्य कणा असतात. त्यांना लॅपटॉप उपलब्ध झाल्यामुळे सामन्यांचे गुणलेखन , तांत्रिक विश्लेषण, खेळाडूंची माहिती व क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत व अचूक होण्यास मदत होईल.”
याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना संघटनेच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा सादर केला. या सोहळ्यासाठी खोखो असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीरंग इनामदार, सुरेखा कुलकर्णी द्रविड, तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील संघटनांचे पदाधिकारी, सचिव, तांत्रिक समितीचे सदस्य आणि मान्यताप्राप्त पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या या पुढाकाराबद्दल आणि राज्य संघटनेच्या या डिजिटल उपक्रमाबद्दल सर्व जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींनी व पंचांनी आभार व्यक्त केले.

चौकट

हे आहेत फायदे

राज्य संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्ह्यांतील सचिवांना लॅपटॉप देण्यात आल्यामुळे जिल्हास्तरावरील प्रशासकीय कामे जलद गतीने होणार आहे. तसेच खो-खोचे सामने व स्पर्धांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवणे, पंच समितीचे निकाल तत्काळ अद्ययावत करणे आणि तांत्रिक कामकाज हायटेक करणे या लॅपटॉपमुळे सहज शक्य होणार आहे.

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी दादांची परंपरा चालवणार

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ; राज्य खो-खो संघटनेतर्फे जिल्हा संघटनांना लॅपटॉप

पुणे, दि. २१ ऑगस्ट ः “खेळ आणि खेळाडूनची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य खो-खो संघटनेचे माजी अध्यक्ष अजितदादा यांची परंपरा पुढे कायम चालवणार आहे. आजच्या डिजीटल युगाचे महत्व ओळखून राज्य संघटनेने सर्व जिल्हा संघटनांना लॅपटॉप भेट दिले. हा उपक्रम निश्चितच सर्वांसाठी आदर्शवत आहे, ” असे प्रतिपादन राज्य संघटनेच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनतर्फे पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे आयोजित लॅपटॉप वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई यांच्या हस्ते राज्य संघटनेशी संलग्न सर्व जिल्हा संघटनांचे सचिव, तांत्रिक समिती व पंचमंडळ यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. डिजिटल युगात क्रीडा व संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि अद्ययावत व्हावे, या उद्देशाने राज्य संघटनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, “आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात क्रीडा क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज असो वा स्पर्धांचे नियोजन, ते डिजिटल होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा संघटनांचे सचिव, तांत्रिक समिती आणि पंच हे कोणत्याही संघटनेचा मुख्य कणा असतात. त्यांना लॅपटॉप उपलब्ध झाल्यामुळे सामन्यांचे गुणलेखन , तांत्रिक विश्लेषण, खेळाडूंची माहिती व क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थापन अधिक सुटसुटीत व अचूक होण्यास मदत होईल.”
याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना संघटनेच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा सादर केला. या सोहळ्यासाठी खोखो असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीरंग इनामदार, सुरेखा कुलकर्णी द्रविड, तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील संघटनांचे पदाधिकारी, सचिव, तांत्रिक समितीचे सदस्य आणि मान्यताप्राप्त पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या या पुढाकाराबद्दल आणि राज्य संघटनेच्या या डिजिटल उपक्रमाबद्दल सर्व जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींनी व पंचांनी आभार व्यक्त केले.

चौकट

हे आहेत फायदे

राज्य संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्ह्यांतील सचिवांना लॅपटॉप देण्यात आल्यामुळे जिल्हास्तरावरील प्रशासकीय कामे जलद गतीने होणार आहे. तसेच खो-खोचे सामने व स्पर्धांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवणे, पंच समितीचे निकाल तत्काळ अद्ययावत करणे आणि तांत्रिक कामकाज हायटेक करणे या लॅपटॉपमुळे सहज शक्य होणार आहे.

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...