रत्नागिरीरत्नागिरीच्या पर्यटनाला मोठा बूस्ट

रत्नागिरीच्या पर्यटनाला मोठा बूस्ट

रत्नागिरीच्या पर्यटनाला मोठा बूस्ट:

भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी १५ कोटी ; मालगुंड प्राणी संग्रहालय दोन वर्षात तसेच गणपतीपुळ्याची विकासकामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
रत्नागिरी, (जिमाका) – : जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डाॕ सामंत यांनी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन प्रकल्पांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, येत्या दोन वर्षांत हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले केले जाईल. भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी एकूण १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून, या निधीतून प्राधान्याने करावयाच्या कामांची रूपरेषा अंतिम करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालय विकसित करणे, गणपतीपुळे विकास आराखडा आणि भाट्ये बीच सुशोभिकरण सादरीकरण याबाबत आज बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एम एस कुलकर्णी, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, कार्यकारी अभियंता आमोल ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डाॕ सामंत बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, येत्या दोन वर्षांत हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले केले जाईल. भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी एकूण १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून, या निधीतून प्राधान्याने करावयाच्या कामांची रूपरेषा अंतिम करण्यात आली आहे.
गणपतीपुळे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी १०२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. यातील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पातील उर्वरित निधी तातडीने मिळावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला जात असून, गणपतीपुळ्याची सर्व कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक, भाविक यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामपंचायत व एमटीडीसीप्रमाणे संस्थानानेही
जीवरक्षक नेमावेत. या जीवरक्षकांना किमान वेतन मिळायला हवे अशी सूचना पालकमंत्री डाॕ सामंत यांनी बैठकीत केली.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...