तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी स्पोर्ट् समार्फत ’ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही परीक्षा पार पडणात आली. ही परीक्षा अखिल भारतीय (ऑल इंडिया) स्तरावर आयोजित करण्यात आली असून, यासाठी संपूर्ण भारतातून तायक्वांदो 500 हून खेळाडू रत्नागिरीत दाखल झाले आहेत. खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची कसून चाचणी या परीक्षेत घेण्यात आली आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी रत्नागिरीतील प्रतिष्ठीत गणराज तायक्वांदो क्लब ( साळवी स्टॉप) चे एकूण 3 खेळाडू पात्र झाले होते.
प्रथम दान साठी उल्लेखनीय कामगिरी केली दुर्वा मंदार हातीसकर, अनया अभिज्ञ वणजू, अहाना आशिष रसाळ, यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, यांना महिला प्रमुख प्रशिक्षक सौ आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या खेळाडूंच्या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा आणि सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, जिल्हा सचिव लक्ष्मण करा, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे गणराज क्लबचे अध्यक्ष अँड सौ. पूजा प्रसाद शेट्ये, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई प्रशांत सुर्वे, नगरसेवक सौ पुजाताई दिपक पवार, नगरसेवक श्री राजन शेट्ये, नगरसेवक श्री सौरभ मलुष्टे, श्री के.एस.पोवार क्लब उपाध्यक्षा सौ.साक्षी मयेकर, सदस्य श्री परेश मोडूंळा, सौ स्नेहा मोरे, श्रीमती शलाका जावकर, सिनियर खेळाडूंनीसह पालक वर्ग सर्व नगरसेवक आदींनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूना शुभेच्छा दिल्या..
