रत्नागिरीपाण्याचे वाटप करीत फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन ने...

पाण्याचे वाटप करीत फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन ने जपली सामाजिक बांधिलकी

पाण्याचे वाटप करीत फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन ने जपली सामाजिक बांधिलकी—

ऐन पाणी टंचाईच्या काळात टँकरने सुरू केला पाणी पुरवठा
चेअरमन प्रकाश छाब्रीया यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वांनीच केले कौतुक
👉रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावात फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व सीएसआर भागीदार मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व मुकुल माधव फाऊंडेशन तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रशासनाचे आभार देखील मानले.

मे महिन्यात अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवतो. अशावेळी फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशन यांनी सामाजिक बांधिलकी जपत गोळप येथील टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. गोळप येथील कातळवाडी, परशुराम नगर, डोंगरेवाडी, हनुमानवाडी व रोहिदास वाडी येथे हा पाणीपुरवठा केला जात आहे. याद्वारे सुमारे १०० कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
या पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे व मुकुल माधव फाऊंडेशन यांचे प्रतिनिधी, तसेच उपसरपंच श्री. संदीप तोडणकर व ग्रामस्थ उपस्थित होते..

Breaking News

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे मुंबई...