रत्नागिरीपुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही–

👉 ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी

👉रत्नागिरी : दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ऐतिहासिक निवासस्थान ‘सावरकर सदन’ पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याच्या संकटात सापडले आहे. ही वास्तू वाचवून तिचे ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती व समविचारी संघटनांनी आज रत्नागिरीतील जयस्तंभ येथे आंदोलन केले. यावेळी शिक्षक परिषद अध्यक्ष राजेश आयरे, भाजप शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचणकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे, भाजप शहर उपाध्यक्ष शैलेश बेर्डे, श्री शिवप्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष गणेश गायकवाड, विहिंपचे अधिवक्ता सचिन रेमणे, रा.स्व. संघाचे समीर करमरकर, सनातन संस्थेच्या शुभांगी मुळ्ये यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘सावरकर सदन वाचवा’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक गोविंद भारद्वाज म्हणाले, “जिन्ना हाऊसला संरक्षण मिळते, मग सावरकर सदनावर पडझड का? सावरकर 1938 ते 1966 म्हणजे तब्बल 4 दशके याच वास्तूत राहिले. बृहन्मुंबई मनपाने 2010 मध्येच या वास्तूचा ‘वारसा’ यादीत समावेश करण्याची शिफारस केली, पण 15 वर्षे शासनाने निर्णय घेतला नाही. याचा फायदा बिल्डर लॉबी घेत आहे.”

➡️ आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:

  1. शासनाने ‘सावरकर सदना’चे त्वरित संपादन करून ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे.
  2. वास्तूची मालकी सरकारने घेऊन सावरकरांच्या हस्तलिखितांचे संग्रहालय, संशोधन केंद्र व डिजिटल लायब्ररी विकसित करावी.
  3. डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधील घराप्रमाणे व इंदू मिल स्मारकाप्रमाणे यासाठी विशेष निधीची तरतूद करावी.

“महायुती व केंद्र सरकारने नेहमीच सावरकरांचा गौरव केला आहे. अंदमान विमानतळाला सावरकरांचे नाव, संसदेतील तैलचित्र, 100 रुपयांचे स्मारक नाणे काढले. त्यामुळे याच सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. शासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तीव्र करू,” असा इशारा समितीने दिला.

Breaking News