रत्नागिरीभारतीय जनता पार्टी, 'रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष' पदी चिपळूणचे श्री. प्रशांत यादव...

भारतीय जनता पार्टी, ‘रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष’ पदी चिपळूणचे श्री. प्रशांत यादव यांची नियुक्ती

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांनी केली आज घोषणा

रत्नागिरी दि. १९ :- भारतीय जनता पार्टी, ‘रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष’ पदी चिपळूणचे नेते श्री. प्रशांत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीत राजेश सावंत यांनी ‘रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष’ पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आजपर्यंत हे पद रिक्त होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांनी आज ही नियुक्तीची घोषणा केली आहे.

भारतीय जनता पार्टी, ‘रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष’ पदी चिपळूणचे श्री. प्रशांत यादव यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...