मुकुल माधव फाऊंडेशनकडून गोळप पूल अंगणवाडीचे नूतनीकरण

मुकुल माधव फाऊंडेशनकडून गोळप पूल अंगणवाडीचे नूतनीकरण

मुकुल माधव फाऊंडेशनकडून गोळप पूल अंगणवाडीचे नूतनीकरण; बालमैत्रीपूर्ण शिक्षणासाठी आणखी एक पाऊल

👉रत्नागिरी
फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण मिळावे या उद्देशाने मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनद्वारे रत्नागिरी तालुक्यातील सात अंगणवाड्यांच्या नूतनीकरणाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत सहा अंगणवाड्यांचे उद्घाटन यापूर्वीच पार पडले असून, सातव्या व अंतिम गोळप पूल अंगणवाडीचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी ११ अंगणवाड्यांमध्ये विकासकामे आगामी काळात करण्यात येणार आहेत

बालविकासाची पायाभरणी अंगणवाडीतूनच होत असल्याची जाणीव ठेवून या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे. स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक परिसर, सुधारित पायाभूत सुविधा आणि बालमैत्रीपूर्ण वातावरणामुळे येथील बालकांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत गोळप गावातील गोळप पूल अंगणवाडीचे नूतनीकरण करण्यात आले. इमारतीची दुरुस्ती, बोलक्या भिंती, रंगकाम, स्वच्छतागृह सुविधा तसेच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे बालकांना अधिक सुरक्षित, आनंददायी आणि शिक्षणास पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे.

सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली मुकुल माधव फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून समाजातील विविध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. अंगणवाडी नूतनीकरण उपक्रम हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण भाग असून, स्थानिक समुदायाकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात आले आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे श्रीदत्त अलबुर (ऑपरेशन डायरेक्टर), सागर चिवटे (फॅक्टरी मॅनेजर), अमित घोरपडे (हेड – सिव्हिल), विकास कुरतडकर आणि आशिष आठवले, तर मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे शामराव निंबाळकर आणि वरद गोरे उपस्थित होते. यांच्यासह गोळप गावाचे उपसरपंच संदीप तोडणकर, कंत्राटदार सुयोग आंबेरकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...