रत्नागिरी भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ वृक्षांचे वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश एक पेड माँ के नाम या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
समाजासाठी सकारात्मक संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या काळात वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या हेतूने विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. एक पेड माँ के नाम या संकल्पनेतून निसर्ग संवर्धनासोबतच आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही संदेश देण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले.
वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची कृती नसून भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा सावली आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमावेळी वर्षा परशुराम ढेकणे, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, नितीन जाधव, मोहन पटवर्धन, विक्रम जैन, मनोज पाटणकर, सचिन गांधी, अनिल शिवलकर, राजन फाळके, शैलू बेर्डे, आशिष मोरे, मुन्ना ढेकणे, मधुरा ढेकणे, प्रीती शिंदे, मंदार भोळे, शंकर शिंदे, संदीप मांडवकर आणि राजेंद्र मयेकर उपस्थित होते.
दादा ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
