रत्नागिरीलांजा तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न

लांजा तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न

लांजा तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न–

पावसाळ्यापूर्वी मतदार संघातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावा आमदार किरण सामंत यांनी दिले प्रशासनाला आदेश-
👉लांजा तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक नुकतीच आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश आमदार सामंत यांनी यावेळी दिले.
बैठकीदरम्यान तालुक्यातील रस्ते, गटारे, नालेसफाई, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मागील वर्षी पावसाळ्यात उद्भवलेल्या अडचणींचा विचार करून यंदा कोणतीही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे आमदार सामंत यांनी सांगितले.
“पावसाळ्यापूर्वी मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावला गेला पाहिजे. नागरिकांना अडचणी येणार नाहीत, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे,” असे ठाम आदेश आमदार सामंत यांनी दिले. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्याबरोबरच संवेदनशील ठिकाणांची विशेष पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विभागांनी आपापल्या कामांचा अहवाल सादर करत लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
लांजा तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, प्रशासनाला दिलेल्या सूचनांमुळे कामांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे तहसीलदार प्रियंका ढोले, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे ,त्याचप्रमाणे सर्व विभागाचे खाते प्रमुख सर्वाधिकारी उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...