हॉटेल व्यावसायिक आणि अन्न- औषध प्रशासनाची बैठक खेळीमेळीत

हॉटेल व्यावसायिक आणि अन्न- औषध प्रशासनाची बैठक खेळीमेळीत

हॉटेल व्यावसायिक आणि अन्न- औषध प्रशासनाची बैठक खेळीमेळीत

रत्नागिरी – अन्न व औषध प्रशासन विभागाकडून हॉटेल व्यावसायिकांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी रत्नागिरीत हॉटेल व्यावसायिकांकडून सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तृप्ती घरत यांनी सांगितले.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं लागू केलेल्या नव्या नियमावली बाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांची जागृती करण्याबाबत येथील लँडमार्क हॉटेलच्या हॉलमध्ये संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तृप्ती घरत, संकेत कोनरी, ज्ञानेश्वर आटपाडकर, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उदय लोध यांच्यासह शहर आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तृप्ती घरत यांनी राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेली नियमावली समजावून सांगितली. वर्तमान पत्रातून अन्न वितरणावर 5 जून पासून पूर्णतः बंदी आहे. सहा महिन्यातून एकदा पाणी तपासणी करून घेणे देखील बंधनकारक करण्यात आलं आहे. तेलाचा पुनर्वापर करण्यावर देखील बंदी आहे. खराब झालेल्या तेलाचा बायो डिझेलसाठी वापर करता येऊ शकतो. त्या दृष्टीनं व्यावसायिक यांनी नियोजन कराव असे तृप्ती घरत म्हणाल्या.

यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी देखील अन्न व औषध विभागाकडून देण्यात आलेली नियमावली लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सहमती दर्शवली. मात्र तपासणी करताना केवळ मोठ्या व्यावसायिकांवर तपासणीचा बडगा नको. अनधिकृत आणि छोटे हातगाडीवाले यांची देखील कठोर तपासणी व्हायला हवी अशी मागणी केली. अनेक हातगाडी चालकांकडे लायसेन्स नाही, अधिकृत सिलेंडर आणि वीज जोडणी नाही त्यांच्यावर देखील कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. यावर हा आदेश सर्वांना लागू असून तपासणी आणि कारवाई करताना भेदभाव होणार नसल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Breaking News