रत्नागिरी‘चला वापरूया सौर ऊर्जा’! सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘चला वापरूया सौर ऊर्जा’! सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘चला वापरूया सौर ऊर्जा’! सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सावर्डे : वाढते प्रदूषण, पारंपरिक ऊर्जास्रोतांचा मर्यादित साठा आणि वाढती विजेची गरज या पार्श्वभूमीवर भविष्यातील शाश्वत ऊर्जेचा मार्ग म्हणून सौर ऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. सिद्धेश सिद्धार्थ जाधव यांनी केले. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे आयोजित ‘चला वापरूया सौर ऊर्जा’ या मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. जाधव यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे विविध प्रकार आणि मानवी जीवनातील ऊर्जेचे महत्त्व सोप्या उदाहरणांतून स्पष्ट केले. याप्रसंगी चित्रफिती च्या साह्याने हा विषय व्याख्यात्यांनी अधिक स्पष्टपणे विद्यार्थ्यांच्या वरती बिंबवला सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख व अक्षय ऊर्जास्रोत असून सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश व उष्णतेचा उपयोग विविध प्रकारे करता येतो, याबाबत त्यांनी शास्त्रीय माहिती दिली.
सौर दिवे, सौर पाण्याचे पंप, सौर वाहने, सोलार कुकर तसेच सोलार पॅनल यांच्या कार्यपद्धतीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सोलार पॅनलमधील फोटोव्होल्टाइक सेलच्या साहाय्याने सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर कसे होते, हे त्यांनी भौतिकशास्त्राच्या तत्त्वांच्या आधारे समजावून सांगितले. घरांवर व संस्थांमध्ये सोलार पॅनल बसविल्यास वीजखर्चात बचत होण्याबरोबरच पर्यावरणाचेही संरक्षण करता येते, असे त्यांनी सांगितले.
‘आजची सौर ऊर्जा ही उद्याच्या स्वच्छ आणि शाश्वत भविष्याची गरज आहे,’ हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रा. जाधव यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेच्या वापराबाबत शास्त्रीय दृष्टिकोन मिळाल्याने कार्यक्रम उत्साहात व माहितीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Breaking News

सर्पदंश झालेल्या मंडणगड येथील १४ वर्षीय अक्षयला वालावलकर रुग्णालयात जीवदान

सर्पदंश झालेल्या मंडणगड येथील १४ वर्षीय अक्षयला वालावलकर रुग्णालयात...