रत्नागिरीचिपळूण रेल्वे स्थानकासह कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची कथित लूटमार व अरेरावी-प्रशासनाने तातडीने दखल...

चिपळूण रेल्वे स्थानकासह कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची कथित लूटमार व अरेरावी-प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी

चिपळूण रेल्वे स्थानकासह कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची कथित लूटमार व अरेरावी-प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी
👉रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या चिपळूण, रत्नागिरीसह संपूर्ण मार्गावर प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत असून, काही विक्रेत्यांच्या कथित अरेरावीच्या वर्तनामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ खरेदी करताना प्रवाशांकडून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः साधा वडापावसुद्धा एका नगाऐवजी दोन नग घेण्यास प्रवाशांना भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच वडे, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ तयार करताना वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेबाबतही प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रवाशांशी सौजन्याने वागण्याऐवजी काही विक्रेत्यांकडून उद्धटपणे बोलणे, मनमानी करणे आणि “आमचे कोणी काहीही करू शकत नाही” अशा प्रकारची दर्पोक्ती केली जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.
कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन खाद्यपदार्थांच्या दरांची तपासणी, दर्जाची नियमित पाहणी तसेच विक्रेत्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
या प्रकारांकडे दुर्लक्ष झाल्यास प्रवाशांमध्ये असंतोष अधिक वाढून भविष्यात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा अनावश्यक वाद निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने कठोर आणि पारदर्शक कारवाई करणे गरजेचे आहे.
प्रवाशांना योग्य दरात, दर्जेदार खाद्यपदार्थ आणि सन्मानपूर्वक सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत ग्राहक हक्क आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांची तपासणी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेश उत्सवाच्या काळात लाखो चाकरमानी कोकण रेल्वे ने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आले आणि गेले. या वेळीही विक्रेत्यांनी पॅसेंजर ना अहवा च्या सव्वा दरात खाद्यपदार्थ देऊन त्यांची लूट केली असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत

Breaking News

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे--काही मांगण्या मान्य करण्यात...

महाड MIDC मध्ये मोठा स्फोट

महाड MIDC मध्ये मोठा स्फोट!Synergia Chem Industries, Plot No....