रत्नागिरीजेईई मुख्य परीक्षा २०२६परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

जेईई मुख्य परीक्षा २०२६परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी, (जिमाका) : राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॕन्ड टेक्नॉलॉजी, आंबव, ता. संगमेश्वर, या परीक्षा केंद्राच्या २००-३०० मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी दिनांक २, ४, ५, ६, ७, आणि ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ पासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
राष्ट्रीय परीक्षा एजेंसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी JEE (Main) 2026 Session 2 ही परीक्षा जिल्ह्यातील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॕन्ड टेक्नॉलॉजी, आंबव, ता. संगमेश्वर, या परीक्षा केंद्रावर दि. २, ४, ५ आणि ६ एप्रिल २०२६ रोजी पेपर -१ (B.E./B.Tech) Shift १ (९ AM to १२Noon) Shift २ (३ PM to ६ PM ) व दि. ०७ एप्रिल रोजी पेपर- २A (B. Arch), Paper २B (B. Planning) And Paper २A & २B (B. Arch & B. Planning both ) Shift २ (३ PM to ६.३० PM) आणि पेपर -१ (B.E. / B.Tech) दि. ८ एप्रिल रोजी Shift २ (३ PM to ६ PM) या कालावधीत घेणार असून, परीक्षा केंद्राचे २००-३०० मीटरच्या परीसरात अपर जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ प्रमाणे

प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्हयातील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, आंबव, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या परीक्षा केंद्राच्या २००-३०० मीटर परीसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी तसेच सदरील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी दिनांक २, ४, ५, ६, ७, आणि ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ पासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात

येणार नाही. २००-३०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण, सायबर कॅफे, फोटोकॉपी इ. माध्यमे आदेशांची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी / पोलीस अधिकारी यांचे बाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडणाच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील.

या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...