फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गावर मांजरे येथे बोलेरो आणि दुचाकीच्या अपघातात दोघेजन जखमी

0
136

संगमेश्वर /एजाज पटेल 

फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गावरील मांजरे येथे बोलेरो आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकी वरील दोन्ही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रत्नागिरी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली.
डिंगणी पोलिसांकडून प्राप्त माहिती नुसार रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील मयुरेश दीपक शिर्के वय वर्ष 29 सध्या राहणार बोहिसर (मुंबई )हे काशिनाथ दीपक शिर्के सैतवडे सद्या राहणार बोईसर (मुंबई ) यांच्या मालकीची असलेली   MH48CT0970 बोलेरो चारकी सैतवडे येथून जाकादेवी -फुणगूस मार्गे बोईसर (मुंबई )येथे प्रवाशी  घेऊन जात असताना जाकादेवी च्या दिशेने MH 03CC/5988 क्रमांकाची दुचाकी घेऊन येणारा गौरव संजय सुर्वे वय 23 वर्ष राहणार कुंभारखणी (संगमेश्वर ) हा जाकादेवी च्या दिशेने येत असताना मांजरे फाटा येथे बोलेरो चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला. दोन गाड्यात धडक बसून झालेल्या अपघातात बोलेरो चारचाकी रस्ता सोडून बाहेर गेली तर दुचाकीचा चेंदामेंदा झाला.

अपघातात दुचाकी चालक गौरव संजय सुर्वे वय वर्ष 23 आणि त्याच्या बरोबर असेलला सहप्रवाशी विजय यशवंत सुर्वे वय वर्ष 63 (दोघेही राहणार संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी ) येथील असून या दोघांना  गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आले. अपघाताची माहिती उपळे गावचे पोलीस पाटील भुते यांनी संगमेश्वर पोलीस अंतर्गत येणाऱ्या डिंगणी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे यांना देताच शांताराम पंदेरे व पोलीस कॉन्सटेबल म्हस्कर यांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला.अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here