मुंबईतील नवसाला पावणारा प्रसिद्ध लालबागचा राजा याचे भक्तिभावाने दर्शन घेऊन उपस्थित मान्यवरांनी श्रींचे आशीर्वाद घेतले.
यावेळी भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय खेडेकर, प्रभाग क्रमांक १च्या नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेविका पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, विभाग प्रमुख संजय हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
लालबागच्या राजाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच रत्नागिरी शहराच्या विकासासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
मुंबईतील नवसाला पावणारा प्रसिद्ध लालबागचा राजा याचे भक्तिभावाने दर्शन घेऊन उपस्थित मान्यवरांनी श्रींचे आशीर्वाद घेतले
