रत्नागिरीअभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा

अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा

अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा
रत्नागिरी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
एम. एस. नाईक प्राथमिक इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी येथे सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रश्नमंजुषा, निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य, संस्कृती आणि महत्त्व याबद्दल आपले विचार मांडले.
मराठी भाषेचा अभिमान विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता. मराठी ही समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली भाषा असून तिचा वापर आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही वाढविण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री. नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकीब काझी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

Breaking News

De Beste Deposit Methods bij het Cashobet Casino

Voor spelers die ooit zijn op zoek naar een...

Game Selection Strategies at conquestador Casino

Choosing the right slots at conquestador casino is more...