रत्नागिरीजागतिक अन्न दिनानिमित्त १६ ऑक्टोबरला मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे आयोजन

जागतिक अन्न दिनानिमित्त १६ ऑक्टोबरला मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे आयोजन

जागतिक अन्न दिनानिमित्त १६ ऑक्टोबरला मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे आयोजन

(आजचा नवोन्मेष, उद्याचे सुदृढ पोषण — जागतिक अन्न दिनानिमित्त मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धा)

रत्नागिरी : जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यंदाच्या जागतिक अन्न दिनाची संकल्पना “आजचा नवोन्मेष, उद्याचे सुदृढ पोषण” अशी आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने मत्स्य व सागरी खाद्यपदार्थांचा आहारातील उपयोग, त्यांचे पौष्टिक महत्त्व, मूल्यवर्धन तसेच विविध नावीन्यपूर्ण पाककृतींबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक पदार्थामागे ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. स्पर्धकांनी मासे, कोळंबी, खेकडे, शिंपले आदी सागरी उत्पादनांपासून तयार केलेला पदार्थ सोबत आणावा. पदार्थ स्वच्छ व आरोग्यदायी परिस्थितीत, उत्तम दर्जाच्या खाद्यतेलाचा वापर करून तयार केलेला असावा. कृत्रिम रंगांचा वापर करू नये. संबंधित पदार्थाची कृती ए-४ आकाराच्या कागदावर लिहून सादर करणे आवश्यक आहे.
सायंकाळी ४ ते ५ या वेळेत पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात येईल. सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत परीक्षकांकडून पदार्थांचे परीक्षण केले जाईल. त्यानंतर, सायंकाळी ७ ते ८ या वेळेत निकाल जाहीर करून पारितोषिक वितरण करण्यात येईल.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ३,००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी २,००० रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी १,००० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय चार उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५०० रुपये अशी असतील. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
इच्छुकांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी डॉ. अपूर्व सावंत (मो. ९३७०९६८८११) किंवा श्रीमती मयुरी डोंगरे (मो. ७०९६१५२२५१) यांच्याशी संपर्क साधावा. ही स्पर्धा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे होणार आहे. नागरिकांनी, गृहिणींनी, विद्यार्थ्यांनी तसेच पाककलेची आवड असलेल्या व्यक्तींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. केतनकुमार चौधरी, प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, यांनी केले आहे.

Breaking News

De Beste Deposit Methods bij het Cashobet Casino

Voor spelers die ooit zijn op zoek naar een...

Game Selection Strategies at conquestador Casino

Choosing the right slots at conquestador casino is more...